मुरमा येथिल शेतकऱ्याकडून करटोलीची यशस्वी शेती
![]() |
मुरमा शिवारात घेतलेले करटोलीचे पिकांचे छायाचित्र. |
पाचोड /विजय चिडे : मराठवाड्यातील रानावनात, वन्य प्रदेशात वा डोंगरदऱ्यांत आढळणारे करटोलेचे पीक आता पैठण तालुक्यातिल मुरमा येथे एका प्रगतशिल शेतकऱ्यांनी या पिकाची प्रायोगिक शेती केली आहे. कमी देखभाल खर्चात, कमी कालावधीत चांगला दर मिळवून देणारे हे पीक असल्याचा अनुभव या शेतकऱ्यांना आला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांतील वन्य, डोंगराळ भागात करटोलीचे पीक आढळून येते.औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील मुरमा येथील एकनाथ लेंभे यांनीही करटुले पिकाची लागवड केली आहे. लेंभे यांची मुरमा शिवारात आठ एकर शेती असुन त्यांनी चार एकार मध्ये मोंसबी ची लागवड केलेली आहे तर दोन एकार मध्ये केळीचे झाडे लावले असुन उरवरीत क्षेत्रात कापूस, तूर, बाजरी, मका, सोयबिन अशी साधारण पीक पद्धती असते.
सिंचनासाठी एक विहिरी व एक मोठे तळे आहे. एरवी टंचाई काळात एप्रिलपासून शेतीला पाणी मिळणे मुश्कील असते. या पिकाचा कीड-रोगांचा प्रादुर्भावही अत्यंत कमी असते त्यामूळे लेंभे यांनी आपल्या पीक पद्धतीतील बदलातून अर्धा एकरावर केलेली करटोलीची लागवड शेतीतील उत्साह वाढवून गेली. त्यांनी कान्हाळा येथिल नातेवाईकांकडून करटोली बीज अनून त्यांनी ते बीज अर्धा एकारात चार बाय सव्वा मीटर अंतरावर लागवड केलेल्या या करटोलीचे दिड महिन्यांत उत्पादन सुरू झाले. ऑगस्टमध्ये दोन तोडे झाले असून औरंगाबाद येथिल बाजारपेठांमध्ये विक्री केली.
त्यास २०० रुपयांपासून ते २२० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. व्यावसायिक उत्पादन घ्यावयाचे असल्याने मजुरांच्या साह्याने नर व मादी फुलांचे परागीकरण केले असून परिणामी अपेक्षित फळे मिळणे सुरू झाले आहेत. नैसर्गिक हिरवा पोपटी रंग असलेल्या या अर्का भारत वाणाच्या करटोल्याचे आठदिवसा आड ३० ते ४० किलो उत्पादन मिळते आहे. आत्ता आठ दिवस सतत पावसामुळे शेतात पाणी साचल्याने उत्पादनाचा वेग मंदावला आहे. त्यातून मार्ग काढताना ठिबक व फवारणीद्वारे मॅग्नेशियम दिले आहे.
व्यापारी १०० ते १२० रूपये प्रतिकिलो भावाने खरेदी करतात,त्यामूळे आम्ही स्वतः औरंगाबाद येथे जावून विक्री केल्यामूळे आम्हांला २०० रूपये किलो भाव मिळाला आहे. गेल्या दोन वर्षा पासून आम्ही वेगवेगळ्या पध्दतीने शेती करत आहे.परंतु कधी जास्त पावसाने नुकसान होत आहे तर कधी दुष्काळ परिस्थिती मूळे नुकसान होत आहे,परंतु यंदा या करटोलीच्या पिकांतून चांगले नफा राहिल अशी अपेक्षा आहे.
–एकनाथ लेंभे, शेतकरी मुरमा