अहिल्यानगर
मनसेचा भर पावसात अहमदनगर जिल्हा दौरा; राहुरी फॅक्टरी येथे शाखा उद्घाटन
राहुरी फॅक्टरी : पुणे मनपाचे नगरसेवक मनसे नेते वसंत तात्या मोरे व मनसेच्या रणरागिणी ॲड. सौ. रुपालीताई ठोंबरे पाटील या दोन नेत्यांनी भर पावसात अहमदनगर जिल्हा दौरा केला. राहुरी फॅक्टरी येथील दौ-याप्रसंगी या मनसे नेत्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालुन अभिवादन करत आशीर्वाद घेतले. यावेळी मनविसेच्या कार्यकारणीच्या फलकाचे अनावरण केले. भर पावसात कार्यकर्त्यांशी चर्चा केली अन् काही सल्ले ही दिले. सदर कार्यक्रम अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष विजय मोगले व मनविसेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुमितभाऊ वर्मा, राहुरी तालुकाध्यक्ष अनिलभैय्या डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
त्या प्रसंगी नवीन पदाधिकारी, नामफलक अनावरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी वैभव गाढे, अमोल पाटोळे, अनिल गीते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश पाटोळे, उपशहराध्यक्ष साहिल पठाण, शुभम गीते, ऋषी पोटे, सचिन सोनवणे, वरुण शिंदे, सौरभ निकम, यश सरोदे, यश आहेर, प्रणव गाडे, सौरभ गोडसे, निखिल सांगळे, नरेश गोरे, सौरभ पाटोळे, सुरज कोठुले, दिप्तेश देसाई, अमित सांगळे, ओंकार तारडे, कुणाल कोबरने, कृष्णा चवले, राहुल कडू, अनिल संसारे, आदेश तारडे, गौरव निकम व राहुरी फॅक्टरी व देवळाली शहरातील असंख्य सामाजिक संघटना मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.