अहिल्यानगर

मनसे नेते नगरसेवक वसंततात्या मोरे व रुपालीताई पाटील यांचे राहुरीत स्वागत

राहुरी प्रतिनिधी : पुणे मनपाचे नगरसेवक वसंत तात्या मोरे व नगरसेविका ॲड. सौ रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी राहुरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांना सदिच्छा भेट दिली. राहुरी शहर व राहुरी तालुका मनसेच्या वतीने राहुरी तालुक्यात करत असलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करुन कौतुकाची थाप पाठीवर दिली आहे.

राहुरी बस स्टँड समोर अतिथी हॉटेल येथे अहमदनगर दौर्यावर असताना नगरसेवक वसंततात्या मोरे आणि पुणे महिला शहर अध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेच्या सैनिकांना भेट दिली आहे. रुपालीताई यांनी राहुरी येथील मनसे सैनिकांना फोनवर शब्द दिला होता, नक्कीच तुम्हाला राहुरीला भेटायला येऊ. आज त्यांनी राहुरी येथे भेट घेऊन महाराष्ट्र सैनिकांच्या कामाचे कौतुक केले व असेच यापुढेही कामं चालु राहु द्या. तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला कळवा  आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून दिलेला शब्द पाळला. राजसाहेब ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहचवणे, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, करत असलेले कामं असेच चालु ठेवा. यावेळी राहुरीतील महाराष्ट्र सैनिकांनी पण त्यांना शब्द दिला आहे. जसे तुम्ही पुण्यात काम करत आहे तसेच तुमच्या कामाने प्रेरित होऊन आम्ही पण नक्कीच राहुरी तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो व करत राहु. वेळ प्रसंगी संघर्ष करण्यासाठीही सज्ज आहोत म्हणताच दोन्हीही नेत्यांनी कौतुकाची थाप पाठीवर मारली. नगरसेवक वसंत तात्या मोरे व सौ रुपालीताई ठोंबरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहुरी तालुक्याच्या वतीने व राहुरी शहराच्या वतीने राहुरी स्टॅण्ड समोर अतिथी हॉटेल येथे सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष अरुण चव्हाण, मनसे शहर अध्यक्ष प्रतिक विधाते, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर माने, राजूभाऊ आढागळे,भाऊराव उंडे, प्रसाद गुंजाळ, गणेश शेडगे सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button