अहिल्यानगर
मानोरी- केंदळ या गावांना जोडणाऱ्या मुळा नदी बंधारा शेजारील पूल अखेर कोसळला
आरडगांव / राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील मानोरी- केंदळ या दोन गावांना जोडणाऱ्या मुळानदी वरील बंधाऱ्याशेजारील पूल अखेर कोसळला असून तीन गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
मानोरी-केंदळ या दोन गावांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील बंधारा शेजारील हा पूल गेल्या अनेक दिवसापासून जीर्ण झाला होता. त्यामुळे हा पूल कुठल्याही स्थितीत कोसळण्याची परीस्थिती निर्माण झाला होती. मात्र तरीदेखील या पुलावरून वाहतूक सुरू होती. सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात ओढे-नाले वाहू लागल्याने या पावसाच्या पाण्याने जीर्ण झालेला हा पूल अखेर कोसळला आहे. सदर घटना रात्री उशीरा घडल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र आता मानोरी, केंदळ, चंडकापूर आदी गांवाचा संपर्क तुटला असून वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा पूल दुरुस्त व्हावा यासाठी वेळोवेळी केंदळ आणि मानोरी येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा केलेला आहे. जलसंपदा मंञी जयंत पाटील यांच्याकडे माजी खासदार प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून पाटबंधारे विभागाकडुन या पुलाच्या दुरुस्तीसाठी २२ लक्ष रूपये निधी मंजुर करून आणला आहे. त्या कामाची निविदा देखील जारी करण्यात आहे.
मात्र आता वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाल्याने तात्काळ या कामास सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी मा. उपसभापती रविंद्र आढाव, सरपंच आब्बास शेख, नवनाथ थोरात, गोकुळ आढाव, शिवाजी आढाव, अनिल आढाव, संदिप आढाव, मच्छिंद्र आढाव, उत्तम खुळे, बबनराव साळुंखे, वैभव पवार, किशोर महाराज जाधव, निवृत्ती आढाव, डॉ.राजेंद्र पोटे, पोपटे पोटे, शामराव आढाव, संभुगिरी महाराज गोसावी, बाबासाहेब आढाव, आण्णासाहेब तोडमल, अशोक आढाव, पकडभाई शेख, मुनसीभाई शेख, बशिर पठाण, राजेंद्र आढाव, विकास आढाव, सुनिल आढाव, ज्ञानदेव आढाव, पंढरीनाथ आढाव, चंद्रभान आढाव, नानासाहेब तनपुरे, बाळासाहेब पोटे, साहेबराव तनपुरे, हाफिज रफिक शेख, मुक्ततार शेख, महेबुब शेख, आयुब पठाण आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.