राजकीय
ह भ प हनुमंत महाराज पावणे यांना महापरिवर्तन महाशक्ती आघाडीकडून उमेदवारी

कर्जत | प्रतिनिधी : कर्जत जामखेड मतदारसंघात महापरिवर्तन महाशक्ती आघाडी कडुन अधिकृत उमेदवारीचा एबी फाॅर्म माजी आमदार धोंडगे यांच्या हस्ते हनुमंत महाराज पावणे यांना देण्यात आला. उद्या दि. २८ रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
हभप पावणे महाराज यांनी गेल्या पाच वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाची मोर्चेबांधणी केली आहे. महाराजांनी प्रस्थापितांना एक प्रकारे आहावान दिले आहे. आता ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या आर्शिवादाने विजय निश्चित होईल असा विश्वास महाराजांनी व्यक्त केला आहे.
तरी कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी परिवर्तन घडविण्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी उद्या कर्जत तहसील कार्यालयात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हभप पावणे महाराजांनी केले आहे.