अहमदनगर

प्रभू येशूच्या कार्याव्दारे लहान थोरांची सेवा करावी: फा. प्रमोद बोधक

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : हरिगाव मतमाउली भक्तीस्थानात पवित्र मरिया जन्मोत्सवानिमित्त सुरु असलेल्या सहावे नोव्हेनाचे पुष्प प्रसंगी फा.प्रमोद बोधक घोडेगाव यांनी”गुरुदीक्षा संस्कार”या विषयावर प्रतिपादन केले की गुरुदीक्षा हा संस्कार धर्मगुरू होऊन धर्मगुरू लोकांची सेवा करण्यास आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारे सेवा केली. ती सेवा धर्मगुरू परमेश्वर प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपाने समाजात राहून लोकांच्या हितासाठी तो करीत आहे. म्हणूनच ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त राजा, संदेष्टा आणि धर्मगुरू या तीन प्रकारच्या भूमिका त्याने निभावल्या. त्या तीन प्रकारच्या भूमिकेमध्ये आज धर्मगुरू देखील ख्रिस्ताचा प्रसाद हा करीत असतो आणि धर्मगुरू होण्याच्या मागचा हेतू म्हणजेच परमेश्वराचे सार्वकालिक जीवन या पृथ्वीवर आणले.
आज आपण पवित्र मारीयेचा जन्मोत्सव साजरा करीत असताना आपल्याला एक आदर्श म्हणून तिच्याकडे पाहण्याची गरज आहे. कारण की ही पवित्र मरीयेने प्रमुख याजकाला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला आणि त्याच्या सेवेसाठी ती नेहमी हजर राहिली. त्याच्या सेवेसाठी नाहीतर त्याच्या प्रेशितांसाठी ती नेहमी झटत राहिली. ती डोंगराळ प्रदेशात जाऊन एलिझाबेथची देखील सेवा केली.
आजचा हा नोव्हेनाचा दिवस साजरा करीत असताना आणि गुरुदीक्षा संस्कार हा सेवेचे व्रत आपण आपल्या अंत:करणात ठेवावे. धर्मगुरू हे नुसते याजकच नाहीतर आपण पूर्ण लोकसमुदाय, ख्रिस्ती समुदाय हा देखील एक याजक आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा ज्याप्रमाणे याजक होता त्याप्रमाणे आपणही स्नानसंस्काराव्दारे आपल्या सर्वाना उत्युच्च अशी प्रतिष्ठा लाभलेली आहे.
आज आपण सर्वजण देखील याजक आहोत म्हणूनच आजचा हा गुरुदीक्षा संस्कार आपल्याला प्रभू येशूचे कार्य म्हणजे त्याच्या सेवांचे कार्य करण्यास भाग पाडत आहे. म्हणून त्या सेवेच्या कार्यासाठी आपल्या पवित्र मरीयेकडे आपण विशेष प्रार्थना करू या की विशेष करून या काळात आपल्याकडून गोरगरिबांची, लहानथोरांची सेवा आनंदाने व प्रभू येशूच्या कार्याव्दारे आपल्याला व्हावी म्हणून आपण आजच्या गुरुदीक्षा संस्कारासाठी म्हणून विशेष करून प.मरीयेच्या मध्यस्थीव्दारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करू या की त्याने देखील याजक म्हणून या जगात सेवेसाठी वरदान द्यावे.
आजच्या दिवशी प्रार्थना करू या”नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, संजय बोधक, डॉमनिक, सचिन मुन्तोडे, रिचर्ड सहभागी होते. दि ८ सप्टे. रोजी पवित्र मरीयेचा जन्मदिवस या विषयावर फा.रॉक अल्फान्सो यांचे प्रवचन होईल व आज सकाळी धर्मगुरुच्या उपस्थितीत जन्मदिन असल्याने केक कापून सर्वांनी आनद साजरा केला. ११ सप्टे रोजी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी लूरडस डांनियल यांचे सणाच्या दिवशी पवित्र मिस्सा व प्रवचन होणार आहे. सर्व कार्यक्रम ऑनलाईन प्रसारित केले जात आहेत. त्यावरून दर्शन व भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button