अहिल्यानगर

हरिगाव मतमाउली यात्रापूर्व पाचवे नोव्हेना पुष्प

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : हरिगाव मतमाउली जन्मोत्सव निमित्त आयोजित केलेल्या पाचव्या नोव्हेना प्रसंगी फा.आशिष म्हस्के यांनी ख्रिस्त शरीर संस्कार या विषयावर प्रवचन करताना प्रतिपादन केले की पवित्र ख्रिस्तशरीर संस्कार ख्रिस्तसभा आपल्याला सांगते संत जॉन मारी व्हीयान्नीच्या शब्दात ख्रिस्तशरीर हा अतिशय महत्वाचा आणि मौल्यवान साक्रामेंट संस्कार परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त सभेव्दारे सर्वाना दिलेला आहे.
प्रभू येशूने स्वत: याची स्थापना केलेली आहे. जुन्या करारात आपण वाचतो वल्ला सणाची निर्मिती झाली आरो राजाच्या गुलामगिरीत तावडीत सापडलेल्या लोकांना वाचविले आणि त्याच स्मरण म्हणून या सणाची निर्मिती झाली आणि तशाच प्रकारे परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवून पापाच्या खाईत सापडलेल्या माणसाला वाचविले आहे. त्याचे स्मरण म्हणजे पवित्र मिस्सा बलिदान. त्याचे स्मरण म्हणजे पवित्र ख्रिस्तशरीर संस्कार, ख्रिस्तशरीर संस्कार आपल्याला पवित्र मिस्सा बलीदानाव्दारे मिळत असतो. पवित्र मिस्सा बलिदान ह्याचे वेगवेगळे भाग आहेत. पहिला भाग..प्रास्तविक व पश्चाताप, या पहिल्या भागात आपण आपल्या अंत:करणाचे शुद्धीकरण करीत असतो.
दुसरा आणि महत्वाचा भाग प्रभू शब्द्विधी आपले सर्व सामान्य जीवन जगत असताना सैतानाची मोहमाया व भुरळ आपल्या अवतीभोवती असते आणि त्यापासून आपल्याला वाचविण्यासाठी परमेश्वराचे शब्द मार्गदर्शन करीत असतात. तिसरा भाग हा अर्पणाचा भाग आहे. अर्पणाव्दारे परमेश्वराने जो त्याग केला आहे त्या त्यागात आपण सहभागी होत असतो आणि तेच आपले खरे समर्पण असते. चौथा भाग आभाराची प्रार्थना, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की हे माझे शरीर आहे, हे माझे रक्त आहे, हे तुमच्यासाठी मी अर्पण करीत आहे. या शब्दाव्दारे भाकर व द्राक्षरसाचे रुपांतर हे प्रभू येशूच्या शरीर व रक्तामध्ये होत असते व त्याव्दारे आपली आध्यत्मिक भूक व तहान भागविली जात असते.
कॅथोलिक चर्च आपल्याला सांगते परमेश्वर जो अन्नाव्दारे आपली शारीरिक भूक भागविण्यास सक्षम आहे. तोच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताव्दारे आपली आध्यत्मिक भूक भागविणार नाही का? ख्रिस्तसभेत अशी बरीच उदाहरणे आहेत. जी आपल्या सांगतात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताव्दारे आपली आध्यत्मिक भूक भागविली गेली आहे व शेवटचा भाग आहे पवित्र कम्युनियन, कि ज्या व्दारे आपण प्रभू येशूख्रिस्ताला आपण ग्रहण करतो व शेवटचा आशीर्वाद घेऊन घरी जात असतो. परमेश्वराचे जे प्रेम या मिस्सा बलिदानात अनुभवले आहे तेच प्रेम आपण इतरांना देण्यासाठी आशीर्वादित होऊन पवित्र मिससा बलिदानात सहभागी होवून घरी जात असतो.
परमेश्वराचे प्रेम इतरांना देण्यासाठी संत डॉमनिक सावियो म्हणतात जर आपल्याला संत व्हायचे असेल तर एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे दररोज पवित्र मिस्सात सहभागी होणे, आपण पवित्र मिस्स्सात सहभागी होऊ या… प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर व रक्ताला ग्रहण करू या व नक्कीच आपले तारण होणार आहे. या नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक, रिचर्ड, सचिन मुन्तोडे आदी सहभागी होते. दि ७ सप्टे रोजी रे.फा प्रमोध बोधक हे गुरुदीक्षा संस्कार या विषयावर प्रवचन करणार आहेत. हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन प्रसारित करण्यात येत आहे. दि ११ सप्टेंबर जन्मोत्सव दिनी रोजी महागुरुस्वामी लूरडस डानियल यांचे सणाच्या मिस्सा प्रसंगी प्रवचन होईल.

Related Articles

Back to top button