अहिल्यानगर
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी येताहेत नागरीक रस्त्यावर ! शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते झोपले का ?
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : श्रीरामपूर- राहुरी रस्त्यावरील बेलापूरच्या प्रवरा नदीवरील रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले असून यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढत आहे, मात्र कुंभकर्णी झोपी गेलेल्या राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची झोप काही करता उघडेना, रोजच वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांबाबत राज्यभरातून बातम्या येतच आहेत, मात्र सार्वजनिक बांधकाम खाते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कारण या खात्याला म्हणावे तसे सक्षम मंत्री महोदय न लाभल्याने आज राज्यभरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे.
या दुरावस्थेला वैतागून शेवटी जागरुक नागरीक स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे बेलापूरच्या प्रवरा नदीवरील स्वखर्चाने खड्डे बुजविणारी ही व्यक्ती काय बोलत आहे हे आपण स्वतः च ऐकावे आणि मगच ठरवावे काय योग्य आणि काय अयोग्य ?
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आजचे असे दृष्ये पाहुन तरी जाग येणार का ? ती ही जराशी लाज असेल तरच, अन्यथा लोकं खड्यात पडत आहे, कोणी जखमी होत आहे तर कोणी मृत्यूमुखी पडत आहे, मात्र राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते झोपेचे सोंग घेऊन नागरीकांच्या जिवीताशी खेळ खेळत आहे. हे शेवटी कुठवर आता असेही सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.