अहिल्यानगर

अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविणार आमदार कपिल पाटील

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीशिक्षक भारती व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने 4 व 5 सप्टेंबर 2021 रोजी साने गुरुजी स्मारक पुणे येथे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते.


या कार्यकर्ता शिबिरास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व प्रमुख जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिरास अहमदनगर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर व जिल्हा हिशोब तपासणी संजराज बोंनतले यांनी सक्रीय सहभाग नोंदवून अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्न आमदार कपिल पाटील यांच्यासमोर मांडले आणि ते लवकरच सोडविणार असे आश्वासन शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिले.

शिक्षक भरती व राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे उद्घाटन शिक्षक भारती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अशोक बेलसरे, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांच्या हस्ते झाले प्रमुख उपस्थितीत राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, आमदार कपिल पाटील जुनिअर कॉलेज युनिट राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, धनाजी पाटील, प्राथमिक विभाग राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, उपाध्यक्ष दिनेश खोसे, महेश पाडेकर, संजराज बोधले महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिक्षक भारती संघटन या विषयी सविस्तर चर्चा झाली. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख प्रलंबित प्रश्न यामध्ये जुनी पेन्शन योजना, बी. डी. एस. प्रणाली, सावित्री फातिमा कॅशलेस आरोग्य योजना, एक तारखेला पगार होणे, विनाअनुदान धोरण रद्द करणे, एकस्तर वेतनश्रेणी, नॉन प्लॅनमध्ये करणे अशा विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा आमदार कपिल पाटील यांनी केली व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर यांचे प्रश्न लवकरच सोडवणार असे आश्वासन दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप सचिव विजय कराळे, जितेंद्र आरु, उपाध्यक्ष रामराव काळे, सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे, माध्यमिक सोसायटीचे संचालक कैलास रहाणे, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद समी, शेवगाव तालुकाध्यक्ष मफीज इनामदार, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सचिन लगड, संगमनेर तालुकाध्यक्ष अमोल वर्पे, श्रीगोंदा महिला अध्यक्ष रूपाली बोरुडे, रुपाली कुरूमकर, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, राजेंद्र जाधव, सुदाम दिघे, संभाजी पवार, संतोष शेंदूरकर, कैलास जाधव, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, घुले, संजय पवार, सुदर्शन ढगे, योगेश हराळे, संतोष देशमुख आदी पदाधिकारी यांनी या निर्णयाचे स्वागत केले

Related Articles

Back to top button