अहिल्यानगर
हरिगाव येथे ३ ते ३० सप्टे,पर्यंत पोषण आहार कार्यक्रम
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : तालुक्यातील हरिगाव येथे ३ सप्टे ते ३० सप्टे.पर्यंत पोषण आहार कार्यक्रम होत असून त्याचा शुभारंभ सरपंच मंदाताई गाडेकर व उपसरपंच चेतन त्रिभुवन यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रम नियोजन सेविका शोभा खंडागळे, मदतनीस आशा कदम यांनी केले. राणी मोरे यांनी परसबाग व परसबागेचे महत्व यावर मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका सौ कासार यांनी ६ महिने ते ६ वर्ष बालकांचा आहार व आरोग्य याविषयी माहिती सांगितली. सर्व महिलांनी परसबाग लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुनिता बनसोडे, मंदा दळवी, आशा बोधक, आशा दळवी, शोभा करवंदे, बेबी खरे आदी उपस्थित होते. अध्यक्षा थोरे यांनी आभार प्रदर्शन केले.