शिक्षणवारी ज्ञान पंढरी

कलागुण आत्मसात करून जीवन परिपूर्ण बनवा – आंतरराष्ट्रीय खडू शिल्पकार डोळसे

आरडगांव/राजेंद्र आढाव : जीवनात कलेचे अनन्य साधारण महत्व असून कोणताही कलागुण आत्मसात करून जीवन परिपूर्ण बनवा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय खडू शिल्पकार अशोक डोळसे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अंबिका माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न झाली. “करूया स्वागत गणरायाचे करून रक्षण पर्यावरणाचे” ही कार्यशाळा महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ सलग्न राहुरी तालुका कलाध्यापक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तम आढाव हे होते.
या कार्यशाळेत पहिली ते दहावी पर्यंत सहा गटात दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते, सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले आले. पुर्वी शहरात अशा स्पर्धा घेतली जात असत विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ घोलप यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना याचे महत्त्व कळावे यासाठी उपक्रम राबविले आहे.
या प्रसंगी राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचे हस्ते पंचवीस विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अशोका आर्ट गॅलरीचे संचालक तथा आंतरराष्ट्रीय खडु शिल्पकार अशोक डोळसे, शिल्पकार देवीदास जगधने, मुख्याध्यापक गोरक्षनाथ घोलप, राजेंद्र धस, बंडा दरकुंडे, सरपंच अब्बासभाई शेख, नानासाहेब कांबळे, रवींद्र आढाव, उत्‍तम खुळे, पोपट आढाव, बाळासाहेब आढाव, मनोज ठुबे, बाळासाहेब पाचरने, साहेबराव तोडमल,‌‌ अण्णासाहेब तोडमल, शिवाजी थोरात, शामराव आढाव, कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे, बाळासाहेब पाचरणे, सुनिल भुजाडी, विशाल तागड, भारत विटनोर, गोरक्षनाथ घुमे, संजय गुंजाळ, सतिष तेलोरे, सिध्दार्थ तागड, रोहिदास गुलदगड, रवींद्र देवरे उपस्थित होते. सूत्र संचालन
गणेश म्हसे यांनी केले.

Related Articles

Back to top button