शिक्षणवारी ज्ञान पंढरी
शिक्षकदिनी शिक्षकांच्या घरभेटीने सन्मान होणे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण – मुख्याध्यापिका खराडे मॅडम
राहुरी प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढवड या शाळेतील मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीने व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या घरी जाऊन गौरव केला आहे. शिक्षकांचा घरभेटीने केलेला गौरव व सन्मान हा शिक्षकांच्या आयुष्यातील एक नवी स्फूर्ती, ऊर्जा व प्रेरणा देणारा अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन कोंढवड शाळेच्या मुख्याध्यापिका खराडे मॅडम यांनी केले आहे.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील हिवाळे, उपाध्यक्ष राजेंद्र सिताराम म्हसे, माजी अध्यक्ष शिवाजीराव औटी, दैनिक सार्वमतचे पत्रकार रुक्मिणीकांत म्हसे, सोशल मीडियाचे प्रमुख विवेक खाडे, विद्या मंदिर प्रशाला राहुरीचे माजी प्राचार्य खराडे सर, मुख्याध्यापक सौ. खराडे मॅडम, राहुल खराडे सर, सौ कल्याणी खराडे मॅडम, वरपे सर, विजय कदम सर, कुलट सर, देवरे सर, पुंड सर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, विद्यार्थी यांचे स्वामी विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, माजी सरपंच व भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव म्हसे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजीराजे पेरणे, कोंढवड गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. आशादेवी उत्तमराव म्हसे, उपसरपंच सौ. कविताताई दिलीपराव म्हसे व सर्व सदस्य ग्रामपंचायत कोंढवड, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक वृंद यांच्यावतीने या वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केल्याचे स्वागत व आभार व्यक्त केले आहे.