अहिल्यानगर
स्नान संस्काराव्दारे आपल्याला जीवनात प्रेरणा मिळते-फा. अमृत फोन्सेका
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : हरिगाव मतमाउली यात्रेनिमित्त दुसरे नोव्हेनाचे पुष्प फा. अमृत फोन्सेका यांनी गुंफले असून त्यांनी नोव्हेनाच्या “स्नान संस्कार”या विषयावर प्रवचन करताना प्रतिपादन केले की आपल्याला जीवनात स्नानसंस्काराव्दारे प्रेरणा मिळते. आदम व इव्हा यांनी पाप केल्यामुळे आपले कृपेपासून वंचित झाले तीच कृपा तेच स्वर्ग आपल्याला पुन्हा मिळणेसाठीदेवाने मारिया मातेला जन्माला घातले आणि मरिया मातेव्दारे आपल्याला देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त मिळाला. त्याने देऊळमातेला सात संस्कार दिलेले आहेत. त्या संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार ख्रिस्ती जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी हा फार महत्वाचा पायाभूत संस्कार आहे. या संस्कारावर्ती अनेक संस्कार अवलंबून आहेत. स्नान संस्काराव्दारे आपण ख्रिस्ताच्या जीवनामध्ये प्रवेश करीत असतो.मूळ पापाचा कलंक धुतल्या जातो. आपल्याला पवित्र आत्म्याचे दान मिळते. आपण देवाची लेकरे बनतो. योहानाच्या शुभ वर्तमानात सांगत आलेले आहे. जितक्यानी त्याचेवर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे आणि स्नान संस्काराव्दारे आपण ख्रिस्ताला परिधान करतो. संत अगस्तीनला झालेला दृष्टांत तू ख्रिस्ताला परिधान कर, अंधाराची शस्त्रे सामुग्री धारण जुगारून दे आणि ख्रिस्ताचा प्रकाश पांघरून घे.स्नान संस्काराव्दारे आपण अंध:कार व पापाला जुगारून ख्रिस्ताला कवटाळतो,ख्रिस्ताला स्वीकारतो त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करून पवित्र आत्म्याव्दारे अभिषिक्त करून त्याच्या प्रेषित कार्यामध्ये सहभागी होतो. स्नानसंस्कारामध्ये आपल्याला ख्रिस्ताबरोबर याजक, संदेष्टा आणि राजा होण्यासाठी त्रिवेणी संगम त्याचे प्रेशित्य कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळत असते.
शुभ वर्तमानातील अध्याय ४ वचन १८ ते २० मध्ये आपण वाचतो परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती अवतरलेला आहे मला अभिषिक्त केले आहे.प्रेशित्य कार्य करण्यासाठी स्नान संस्काराव्दारे आपणा सर्वाना अभिषिक्त करण्यात येते ख्रिस्ताच्या प्रेशित्य कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपण सर्वजण ख्रिस्ताच्या प्रेशित्य कार्यामध्ये सेवाभावी जीवनामध्ये प्रार्थनेव्दारे, त्यागाव्दारे सहभागी होत असतो आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो हाच स्नान संस्कार आपल्याला प्रेरणा देत असतो फ्रान्सचा राजा लुईस नववा हा जेंव्हा सही करायचा तेंव्हा तो फ्रान्सचा राजा लुईस नववा म्हणून सही न करता लुईस ऑफ फ़ोसिओ म्हणून सही करायचा. त्याला विचारले तर त्याने सांगितले की ज्या महामंदिरामध्ये माझ्या डोक्यावरती मुकुट घालून मला अभिषिक्त राजा म्हणून अभिषिक्त करण्यात आले होते. त्या दिवसापेक्षा ज्या चर्चमध्ये मला स्नान संस्कार मिळवून मी देवाचे लेकरू बनलो तो दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा होता होय.
माझ्या प्रिय बंधू भगिनीनो स्नान संस्काराव्दारे आपण देवाचे बाळ देवाचे लेकरू म्हणून वावरत असतो. मूळ पापांचा कलंक धुतल्यामुळे आपण देवाच्या प्रकाशामध्ये वावरून देवाचा प्रकाश इतरांना देण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रयत्नशील रहात असतो. मरिया मातेने ज्याप्रमाणे कृपेने आपल्याला कृपा दिलेली आहे. तिच्याप्रमाणे पापविरहीत जीवन जगण्यासाठी आणि जगाला संदेश व प्रकाश देण्यासाठी आपण विशेष प्रार्थना करू या… आजच्या नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, ब्रदर रॉलसन तुस्कानो, रॉनी मस्कारनस, जेम्स पठारे सहभागी झाले होते. दि ४ सप्टेंबर रोजी फा.प्रकाश भालेराव यांचे प्रायश्चित संस्कार या विषयावर प्रवचन होईल.