अहिल्यानगर
भाजपा उत्तर नगर जिल्हा सेवाकार्य च्या संपर्क प्रमुखपदी तरस
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते रामभाऊ तरस यांची नियुक्ती प्रसंगी श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष अरुण काळे आदी.
खैरी निमगाव प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या उत्तर नगर जिल्हा सर्व शासकीय योजनांच्या जिल्हा व्यासपीठ (सेवाकार्य) च्या संपर्क प्रमुख पदी रामभाऊ तरस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते रामभाऊ तरस यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
या प्रसंगी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. समाजातील पात्र असलेल्या परंतु अजुनही शासकीय योजनांपासुन वंचित असलेल्या घटकांना लाभ मिळवून देण्याच्या या सेवाकार्य चे काम आहे. रामभाऊ तरस यांची नियुक्ती झाल्याने ते शासकीय योजनांचा शेवटच्या पात्र घटकापर्यंत या व्यासपीठाच्या माध्यमातुन माहिती पोहचवून नक्कीच लाभ मिळवुन देतील. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे श्रीरामपुर तालुका उपाध्यक्ष अरुण काळे पाटील उपस्थित होते.