अहिल्यानगर
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्याची ना. थोरातांकडे मागणी
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील विविध विकास कामाच्या उदघाटन करण्यासाठी उंदिरगाव येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात येत असताना सरपंच चहा हॉटेल, हरेगाव येथे काँग्रेस कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस सौ. भावना सुनिल शिनगारे यांनी मान्यवरांचे औक्षण केले.
स.न. 2016 पासूनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, असे निवेदन सुनील शिनगारे यांनी दिले. हरेगाव परिसराचा गेल्या 15 वर्षा पासून प्रलंबित असलेला वाढीव गावठाणचा प्रश्न मार्गी लावावा, असे निवेदन देण्यात आले. कारण जागा नसल्यामुळे दर वर्षी हरेगाव ग्रा. प. घरकुला साठी यादी प्रसारित होते. परंतु जागे अभावी नागरिकांना घरकुलचा लाभ मिळत नाही. सर्व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कानडे, श्रीरामपूर न.पा. उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हरेगावचे ग्रा. प. सदस्य माजी सरपंच रमेश भालेराव, मारुती शरनागते, अरुण बनसोडे, नाना कापसे, सुनील रुपट्टके, कादिरभाई शेख, राजूभाई मणियार, संदीप लोखंडे, डॉ.नंदकुमार वाघमारे, नाना खरात, राजू चव्हाण, किशोर धोत्रे, अनिल लिहीनार, बिबन शेख, बाबा लिहिणार, मुन्नाभाई शेख आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.