सामाजिक

राहुरी येथे मोफत दंत रोग, डोळे तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर

राहुरी प्रतिनिधी : श्री संत सावता माळी युवक संघ राहुरी शहर व तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने कै. रघुनाथ दादा गुलदगड यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त रविवार दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ०९:०० ते ०१:०० वा. या दरम्यान बुवासिंध बाबा तालीम संघ हॉल, माळी गल्ली, ता. राहुरी, जि. अहमदनगर येथे दंत रोग व डोळे तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले आहे.
दंत तपासणीसाठी नगर येथील डॉ. गोरे व दंत तपासणी शिबीर व डोळे तपासणी आनंद ऋषिजी हॉस्पिटल यांचे मोफत शिबीर आयोजित केले आहे. डोळे तपासणीस येताना घरचा मोबाइल क्रमांक, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड व चालू असणारी औषधे सोबत आणणे आवश्यक आहे. मोतीबिंदू ऑपरेशनसाठी निवड झालेल्या रुग्णांची ऑपरेशन आनंद ऋषीजी नेत्रालय, अहमदनगर येथे सवलतीच्या दरात केली जातील. नंबरची चष्मे अल्प दरात तयार करून मिळतील. तरी दंत रोग व डोळे तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. किरण रघुनाथ गुलदगड, जिवन रघुनाथ गुलदगड यांनी केले आहे. कोरोना महामारी प्रादुर्भाव रोखणे या संबंधी नियमांचे पालन करुन हे शिबिर संपन्न होणार आहे. पुण्यस्मरण निमित्ताने ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रवचन होईल.

Related Articles

Back to top button