अहिल्यानगर
सावरचोळ येथे लसीकरण उत्साहात संपन्न
संगमनेर शहर : किसान क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतिषराव कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरचोळ येथील मेंगाळवाडी -बिरोबा मंदिर या ठिकाणी केंद्र सरकार तर्फे सुरू असलेल्या लसीकरणाचा ५वा टप्पा प्रशासन व पदाधिकारी वर्गाच्या सहकार्याने तसेच ग्रामपंचायत सरपंच अनिता संपतराव कानवडे, ग्रामसेवक सौ यशोधाताई वर्पे, पोलीस पाटील संजय कानवडे, आरोग्यसेवक डॉ.बोडके, डॉ.योगेश गोंधळी, डॉ.लहरे ताई, आशा स्वयंसेवक शोभा कानवडे, सुनंदा गांडाळ, सुरेखा कानवडे, वंदना कानवडे, वनाधिकारी जोस्तना बेंद्रे, ग्रामपंचायत कर्मचारी हिरामन मेंगाळ व लहू जाधव यांनी लसीकरनासाठी सुंदर नियोजन केले.
प्रशासन कर्मचारी ग्रामस्थांना ऑनलाईन रेजिस्ट्रेशन साठी मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सागर कानवडे व उत्तर नगर सोशल मीडिया जिल्हा सरचिटणीस विजय भूतांबरे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब कानवडे यांनी सहकार्य केले.
५व्या टप्यात १७५ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले. उर्वरित १८ वर्षा वरील नागरिकांनी मनात कसली ही शंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आव्हान भाजपा नेते संपतराव कानवडे, युवानेते सागर कानवडे यांनी केले