अहिल्यानगर

लेखी आश्‍वासनानंतर प्राणांतिक आमरण उपोषण मागे

आरडगाव/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील जुना वहिवाटी रस्ता बेकायदेशीर भिंतीचे बांधकाम करून बंद केल्याबाबत व सौरऊर्जा प्रकल्पासाठी गायरानातील २५ एकर क्षेत्र ग्रामस्थांना विश्वासात न घेता खाजगी कंपनीला देऊ केल्याने या खाजगी कंपनीकडून गावाला काय उत्पन्न मिळेल हे जाहीर करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनिल जाधव व ग्रामस्थ ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणाला बसले होते.

याठिकाणी दुसऱ्या दिवशी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांच्या मध्यस्थीने ग्रामसेवक, सरपंच यांच्या लेखी आश्‍वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. याठिकाणी तहसीलदार फसियोद्दीय शेख यांनी देखील भेट देऊन अधिका-यांना योग्य सुचना दिल्या होत्या. यावेळी बापुसाहेब धसाळ, अशोक काळे, किरण बोरावके, रावसाहेब वने आदि ग्रामस्थांनी उपोषणास पाठींबा दर्शवला आहे.

उपोषणास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष
अनिल जाधव, सुनिल जाधव, मच्छिंद्र बर्डे, सुभाष निकम, अनिल भारती, सुनिल जाधव, गोरक थोरात, बाबासाहेब जाधव, सुरेश जाधव, रवींद्र गायकवाड, लक्ष्मण निकम, भाऊराव निकम, दत्तात्रय जाधव, हरीभाऊ पवार, साहेबराव जाधव, बंडू देशमुख, रवींद्र जाधव, मच्छिद्र निकम, सागर देशमुख हे बसले आहेत. पोलीस हे काॅ.महेंंद्र गुजांळ यांनी बंदोबस्त ठेवला होता.

आरडगाव येथील गायरानातील २५ एकर क्षेत्र सौरऊर्जा प्रकल्पासाठी खाजगी कंपनीला दिले याबाबत येणा-या ग्रामसभेत करारनाम्यापुर्वी ग्रामस्थांशी चर्चा करण्यात येईल. तसेच आरडगांवातील गट नं १ ते ८ व ग्रा.प.९ याची मोजणी करून रस्ता मोकळा करूण देण्यासाठी सहकार्य करू, असे लेखी पञ आंदोलकांना ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या सहीनिशी देण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button