अहिल्यानगर

एकाच बाजुला साईट गटारे घेऊन शेतक-यांवर अन्याय करू नका

आरडगांव/ राजेंद्र आढावराहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मानोरी शिवारातील मानोरी ते गणपतवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन होणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजुने समसमान साईट गटारे घ्यावीत आणि एकाच बाजुच्या शेतक-यांवर अन्याय करू नये अशी मागणी शेतक-यांकडुन करण्यात आली आहे.

मानोरी ते गणपती मुख्यमंञी ग्राम सडक योजनेतुन होणा-या डांबरीकरण रस्ताचे काम सुरू होत असल्याचे सदर ठेकेदाराकडुन रस्त्याच्या दोन्ही बाजुने मार्किंग केल्याने काही शेतक-यांनी त्यावर आक्षेप घेत दोन्ही बाजुने सारख्याच साईट पट्या कराव्यात, कुण्या एका बाजुने कमी-जास्त साईटपट्या करू नये ,दोन्ही बाजुच्या शेतक-यांना सारखाचा न्याय द्यावा अशी मागणी लाभधारक शेतक-यांनी केली आहे. रस्त्याच्या बाजुने असलेले विद्युत पोल ही बाजुला हटावीत अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.

या ठिकाणी नितीन चोथे, दत्ताञय आढाव, सुनिल पोटे, बाबुराव मकासरे, शिवाजी पोटे, गणेश चोथे, संजय आढाव, ज्ञानदेव आढाव, भास्कर आढाव, लहाणु चोथे, संभाजी पोटे, बापुसाहेब आढाव, आप्पासाहेब आढाव आदिंसह लाभधारक शेतकरी उपस्थित होते. प्रसंगी तहसीलदार फसियोद्दीय शेख यांच्या आदेशानुसार तलाठी प्रविण जाधव यांनी याठिकाणी पहाणी केली आहे.

Related Articles

Back to top button