सामाजिक
तांदुळवाडी येथे पोलीस मित्र संघटना शाखेचे उद्घाटन
शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कमलेशजी शेवाळे, वसिम शेख, रविंद्र सुर्यवंशी, भरत नजन, बाळासाहेब पेरणे, विनित धसाळ, सचिन दिघे, भाऊसाहेब पेरणे आदी मान्यवर.
आरडगाव/ राजेंद्र आढाव : तांदुळवाडी येथे पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र या शाखेचा मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटात उद्घाटन झाले. प्रथमता मान्यवरांनी तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण केला. तदनंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन कार्यक्रम सुरूवात झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांदुळवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब पेरणे हे होते. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय महासचिव कमलेशजी शेवाळे, प्रदेशाध्यक्ष वसिम शेख, संपर्क प्रमुख रविंद्र सुर्यवंशी, ऊत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भरत नजन, ऊत्तर महाराष्ट्र संघटक संतोष जाळवे, अहमदनगर जिल्हा संपूर्ण प्रमुख सचिन दिघे, शरद शिंगाडे, समर्थ जगताप, अभिषेक गिते महाराज, अशोक तुपे, सोनाली कुसळकर मॅडम, भागवत तनपुरे, नानासाहेब बोर्डे हे पाहुणे म्हणून आले. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रमाणपत्र व ओळखपत्रे वितरण करण्यात आली. तांदुळवाडीच्या अध्यक्ष पदी भाऊसाहेब गंगाधर पेरणे, उपाध्यक्ष पदी नितीन रेवन्नाथ खडके, सचिवपदी प्रसाद भास्कर पेरणे यानां निवडीचे पत्र देण्यात आले.
कार्यक्रमास माजी सरपंच गणपत पेरणे, पांडुरंग पेरणे, अविनाश पेरणे, अशोक तोडमल, विजय घोरपडे, प्रमोद खडके, महेश महाराज खाटेकर, गोरख डोईफोडे, भाऊसाहेब धसाळ, अमोल धसाळ, प्रदिप धागुडे, संजय धागुडे, दादासाहेब धसाळ व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन पत्रकार विनितजी धसाळ यांनी केले.