अहिल्यानगर

एस टी कॉलनी दुकानासमोर गाळाचा रस्ता

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : शहरात आता पावसाचे वातावरण असल्याने सगळी कडे चिखल व गाळ रस्त्याच्या कडेला आणि दुकानासमोर साचत असल्याने दुकानदार व ग्राहक यांची गैरसोय झाल्याने नकळत धंद्यावर फार मोठा परिणाम होत आहे.हा सर्व गाळ मालधक्क्यावरून या भागात पसरला आहे त्यामुळे रस्त्यावरून गाडी चालविणे अवघड झाले आहे. रस्त्याने जाणाऱ्या लोकांवर चिखल उडतो.वेळप्रसंगी गाड्या स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यता असते. या गाळामुळे खड्डे पडून तो खराब होणार असल्याने श्रीरामपूर नगरपालिकेने त्वरित लक्ष घालून त्या ठिकाणी मुरूम अथवा इतर साहित्य टाकावे जेणेकरून कोणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता नगरपालिकेने घ्यावी अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते इसाक्भाई पठाण, संदीप जौक, असिफ शेख, सुजित रणछोड, आदित्य झुटिंग, सोमनाथ पतंगे, योगेश घोरपडे, सोमनाथ धाकतोडे , लक्ष्मण कावडवाले, अश्रफ शेख आदी दुकानदारांनी दिले आहे.

Related Articles

Back to top button